संपर्क : 020-67475050 | ई-मेल : enquiry@niraamay.com

शरीरातील प्रमुख चक्रे

bg-chakra

अनेक प्राचीन शास्त्रांच्या जसे की, योगशास्त्र, मुद्राशास्त्र, अक्षरब्रह्म/ नादब्रह्म, निसर्गोपचार, समुपदेशन इ.च्या अभ्यासातून साकारली आहे स्वयंपूर्ण उपचारपद्धती. या उपचारांद्वारे मुख्यत्वे शरीरातील सप्त चक्रे, नाड्या व पंचतत्त्वांवर उपचार केले जातात. पंचतत्त्व म्हणजे आकाश, वायू, अग्नी, जल व पृथ्वी. या पंचतत्त्वांपासून बनला आहे निसर्ग. मनुष्य हा निसर्गाचाच एक भाग आहे. मनुष्य देह दोन प्रकारचा आहे – स्थूल व सूक्ष्म. स्थूल शरीरात निरनिराळी इंद्रिये, हाडे, स्नायू व रक्तवाहिन्यांचे जाळे असते. सूक्ष्म शरीरामध्ये ऊर्जावाहिनी नाड्या व चक्रे असतात. यामध्ये उत्पन्न झालेल्या दोषांचे निवारण स्वयंपूर्ण उपचारांद्वारे केले जाते.

स्वयंपूर्ण उपचारांद्वारे विनाऔषध कोणताही आजार बरा होऊ शकतो. हा चमत्कार नाही, निसर्ग नियम आहे. कोणताही चमत्कार, कधीही निसर्ग नियमांच्या विरुद्ध जाऊन होत नसतो. फक्त निसर्गातील जे नियम आपल्याला ज्ञात नसतात, त्यानुसारच होत असतो.