संपर्क : 020-67475050 | ई-मेल : enquiry@niraamay.com

निरामय विषयी

सर्वे सन्तु निरामयः।

 

आज एकविसाव्या शतकात वावरताना प्रत्येकालाच ताणतणावाचा सामना करावा लागतो आहे. मग तो कार्यालयीन कामकाजात असो किंवा घरगुती जीवनात असो; परंतु हे करत असताना मनुष्यप्राणी आपल्या मनावरचा ताबा हळूहळू गमवू लागला आहे. परिणामी अगदी छोट्या आजारांपासून कॅन्सर, टी.बी.सारख्या मोठ्या आजारांनी मनुष्याला ग्रासले आहे.

अशा आजारांचे निदान होण्याचा वयोगटही आज तारुण्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. या सगळ्याला आपण ‘लाईफ स्टाईल बदलल्याचे’ एक गोंडस कारण पुढे करतो आणि आजीवन गोळ्या-औषधांचे डोस सुरू करतो. या औषधांनी तात्पुरते बरे वाटल्याचा भास होतो, मात्र संपूर्ण आरोग्य तर मिळताना दिसत नाही. उलटपक्षी या औषधांच्या चक्रव्यूहात आपण अडकत जातो व दिवसेंदिवस शरीराची रोगप्रतिकारशक्तीही कमी होत जाते. शिवाय पुढील काही वर्षांनंतर याचे ‘साईड इफेक्ट’ही जाणवू लागतात अन् नवीन आजारांना सुरुवात होते. हे चक्र कुठेतरी थांबायला हवं.

‘निरामय’मध्ये कोणत्याही औषधाशिवाय, स्पर्शाशिवाय कुठलेही शारीरिक आणि मानसिक आजार बरे केले जाऊ शकतात. आजपर्यंत 80 हजारांपेक्षाही अधिक रुग्णांनी या उपचारपद्धतीचा लाभ घेतलेला आहे. अगदी छोट्या दवाखान्यापासून ते देशातील मोठ्या रुग्णालयात गेल्यावरही आजार बरा न झालेले अनेक पेशंट एक शेवटची आशा म्हणून ‘निरामय’मध्ये येतात व या उपचारपद्धतीचा त्यांच्या आजारामध्ये ‘संजीवनी’सारखा उपयोग होतो, असा अनेकांचा अनुभव आहे.

स्वयंपूर्ण उपचारांचे उद्दिष्ट फक्त रोगलक्षणे दूर करणे नसून रोगाचे समूळ निवारण हेच आहे. शरीराची नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती प्रबळ करण्याचे काम याद्वारे केले जाते. बर्‍याचदा आजाराची कारणे, अयोग्य आहार-विहार, चुकीचे विचार, व्यायामाचा अभाव, ताणतणाव, प्रदूषित वातावरण व औषधांचा अविचारी, अतिरेकी वापर ही असतात. या सार्‍यामुळे आपल्या शरीरातील ऊर्जावाहिनी नाड्या व चक्रांमध्ये अवरोध निर्माण होतो. ज्याचे रूपांतर पुढे रोगांत होते. कोणत्याही रोगाचे समूळ उच्चाटन स्वयंपूर्ण उपचारपद्धतीमुळे होऊ शकते. स्वयंपूर्ण उपचारांच्या माध्यमातून शरीर, मन व ऊर्जेवर काम केले जाते. ज्यामुळे शरीर निरोगी व बळकट बनते. मन शांत, कणखर व खंबीर बनते आणि या दोन्हीमधील दुवा असणारी ऊर्जा किंवा चैतन्य प्रत्येक पेशीत स्थिर राहण्यास मदत होते. या उपचारामुंळे केवळ रोगमुक्ती नव्हे तर मनःशांतीही प्राप्त होऊ शकते.

प्राचीन शास्त्र, ग्रंथसंपदा, वेद आणि उपनिषदे यांचा अभ्यास व अनेक प्रयोगाअंती या आधुनिक पद्धतीचा विकास झाला आहे. याच्या उपयोगामुळे मनुष्याच्या शरीरातील चैतन्यशक्ती किंवा जीवनप्रवाह सुरळीत होऊन शरीर व मन क्रियाशील व निरोगी होण्यास मदत होते. संपूर्ण नैसर्गिक ऊर्जेच्या माध्यमातून रुग्णांना विनाऔषध रोगमुक्त करण्यासाठी या उपचारपद्धतीचा आविष्कार केला आहे.

समाजासाठी स्वयंपूर्ण उपचारपद्धती विकसित करताना त्यामागचा प्रांजळ हेतू हाच होता कि आपल्या प्राचीन शास्त्राचे महत्त्व सर्वसामान्यांना कळावे व त्याचा लाभ घेता यावा. आपल्या पूर्वजांच्या ज्ञानाचा थोडासा कवडसा समाजाला दाखवावा हाच यामागचा दृष्टिकोन.

अनुभव

फुप्फुसे व्यवस्थित कार्यरत झाली, लोबेक्टॉमीही टळली - कु. अर्चना रावले

मी अवघ्या 26 वर्षांची आहे, पण गेल्या दहा वर्षांत मला तीनदा ‘टीबी’झाल्याने मी पूर्ण खचून गेले होते. डॉक्टरांनी तर मला ‘लोबेक्टॉमी’ (फुप्फुसाचा काही भाग काढून टाकणे) सजेस्ट केली होती. पण मला ऑपरेशन करायचं नव्हतं. झोप न येणे, ऐकायला कमी येणे आणि सतत वजन कमी होणे असे औषधांचे दुष्परिणाम मला जाणवत होते. अ‍ॅलोपॅथीची औषधं घेऊन आणि डॉक्टरांचे सल्ले ऐकून मी वैतागले होते.

दरम्यानच्या काळात दै. लोकसत्तामध्ये ‘निरामय’संदर्भातील लेख वाचला आणि एक शेवटचा पर्याय म्हणून याकडे पाहू लागले. माझ्या नशिबाने मला योग्य वेळी या उपचारांबद्दल कळले व माझे आयुष्यच बदलून गेले. आता मला व्यवस्थित ऐकू येते, शांत झोप लागते व वजनही वाढत आहे. डॉ. चांदोरकर मला भेटले नसते तर आज मी या सुस्थितीत नसते. ‘निरामय’च्या स्वयंपूर्ण उपचार पद्धतीने माझ्यात अमूलाग्र बदल झाले. गेले 10 महिने चाललेल्या स्वयंपूर्ण उपचारांमुळे माझी फुप्फुसे व्यवस्थित कार्यरत झाली असून माझी लोबेक्टॉमीही रद्द झाली आहे. यापुढे कधीही मला ‘टीबी’होणार नाही, याची आता मला खात्री वाटते.