संपर्क : 020-67475050 | ई-मेल : enquiry@niraamay.com

दूरस्थ उपचार

दूरस्थ उपचार घेण्यासाठी सेंटर मध्ये फोन करावा लागतो. पेशंटचा नंबर व नाव सांगितल्यानंतर उपचारासाठी बसण्यास सांगितले जाते. सेंटर मध्ये उपचारकांची एक मोठी टीम सकाळी 8 वाजल्यापासून पहाटे 6.०० वाजेपर्यंत (22 तास) 365 दिवस कार्यरत असते. डॉक्टरांनी नमूद केल्याप्रमाणे रुग्णास उपचार देण्याचे काम येथे अथक सुरु असते.

फोनवरून उपचार :
वेळ – सकाळी 8.०० ते पहाटे 6.०० (22 तास)
दूरस्थ उपचार कसे कार्य करतात?

हे कसे शक्य होते, ते आपण समजून घेऊ. पेशंट कुठेतरी, डॉक्टर कुठेतरी आणि फक्त 5 ते 10 मिनिटं शांत बसून शारीरिक व मानसिक व्याधीतून मुक्ती कशी मिळू शकते? याचं उत्तर शोधण्यासाठी याचे शास्त्र समजून घेऊ.

आज आपण मोबाइलवर बोलतो. मोबाइलवर नंबर डायल केला की क्षणार्धात तो तुम्हाला जगाच्या पाठीवर कोठेही संपर्क करून देऊ शकतो. हे कसे घडते? वातावरणातील ध्वनिलहरींचे (टेलिकम्युनिकेशन) सॅटेलाईटद्वारे प्रक्षेपण होऊन ही प्रणाली कार्यान्वित होते व काही सेकंदात जगात कोठेही संपर्क साधता येतो. असेच या उपचारपद्धतीतही घडते. पृथ्वीवरील प्रत्येक जीव हा नैसर्गिकरीत्या युनिव्हर्सल कनेक्टिव्हिटीद्वारे एकमेकाशी संलग्न आहे. जसे आपण गुरुत्वाकर्षणामुळे जमिनीशी बांधलेले आहोत, तसेच युनिव्हर्सल कनेक्टिव्हिटीमुळे एकमेकांशी बांधलेले आहोत. या कनेक्टिव्हिटीमार्फत हे उपचार केले जातात. यासाठी उपचार घेणाऱ्याच्या परवानगीची आवश्यकता असते व त्यासाठी त्याने फोन करणे गरजेचे असते.

नागिणीसारख्या आजारातही लगेच आराम पडला - श्री. दिलीप पंडित, ग्रुप कॅप्टन

ऑक्टोबर 2012 मध्ये मला ‘नागिणी’च्या आजाराने ग्रासले. पाठीवर आणि छातीवर पाण्याने भरलेल्या छोट्या पुळ्या झाल्या होत्या. कोणीतरी आपल्याला गरम सुईने टोचत असल्यासारखा त्रास होत होता. यासंबंधी आमच्या ‘फॅमिली डॉक्टरां‘शी चर्चा केल्यावर त्यांनी वैद्यकीय दृष्ट्या हतबलता दाखविली. पेनकिलर देण्याशिवाय  माझ्याकडे काहीच पर्याय नसल्याचे त्यांनी मला सांगितले.

एक आठवडा या असह्य वेदना सहन करत मी कोणत्यातरी चमत्काराच्या प्रतीक्षेत होतो. त्यावेळी माझ्या मामेबहिणीने डॉ. योगेश चांदोरकर यांचे नाव सुचविले. पहिल्या ट्रीटमेंटमध्येच मला थोडा धीर आला. दोन दिवस सातत्याने ट्रीटमेंट घेतल्यावर वेदना होणे पूर्णपणे थांबल्या व तिसर्‍या दिवशी पुळ्यांच्या खपल्याही पडल्या व त्वचा स्वच्छ होऊ लागली.

डॉ. चांदोरकरांनी कोणत्याही औषधाविना मला पूर्णबणे बरं केल्याने माझ्यासह माझ्या सर्व कुटुंबीयांना तसेच खुद्द ‘फॅमिली डॉक्टरां‘नाही एक चमत्कार घडल्याचाच अनुभव आला.