संपर्क : 020-67475050 | ई-मेल : niraamayjeevan@gmail.com
banner2

‘कोरोनामुळे झालेल्या लाॅकआऊटमुळे आज पासून पुढील २१ दिवस ट्रीटमेंटचा लॅंडलाईन बंद रहाणार आहे. त्याऐवजी रूग्णांनी 8600037158/59/60 व 7028081151/52/53 या मोबाईल्सवर ट्रीटमेंटसाठी फोन करावेत. काळजी करू नये. आम्ही सदैव तुमच्याबरोबर आहोत. होणाऱ्या गैरसोयीबद्दल क्षमस्व.’

सर्वे सन्तु निरामयः।

निरामय’ म्हणजे संपूर्ण आरोग्य. W. H. O. म्हणते शारीरिक, मानसिक आणि सामाजिक पातळीवरील स्वास्थ्याची भावना म्हणजे आरोग्य. अशा आरोग्यासाठी गरज असते संपूर्ण शरीरस्वास्थ्य, मन:स्वास्थ्य आणि वैचारिक प्रगल्भतेची आणि असे निरामय जीवन सगळ्यांना मिळावे यासाठीच निर्माण झाले

स्वयंपूर्ण उपचार

‘स्वयंपूर्ण’ म्हणजे प्रत्येकातील ‘स्वयं’ला पूर्णत्वाकडे नेण्याची प्रक्रिया… पूर्णत्व म्हणजे केवळ रोगमुक्ती नाही तर ती आहे आनंदाची अनुभूती. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा शरीर व मन दोन्हीही सशक्त व निरोगी असेल. माणसाचे अस्तित्व हे तीन स्तरांमध्ये आहे शरीर, ऊर्जा व मन. ऊर्जा हा शरीर व मनातील दुवा आहे.

 विनाऔषध | विनास्पर्श

स्वयंपूर्ण उपचारांची उत्पत्ती ही निसर्गोपचार व योगशास्त्रातून झालेली आहे. या उपचारामध्ये वैश्विक ऊर्जा वापरून रुग्णाच्या शरीरातील ऊर्जा संतुलित केली जाते. विनाऔषध विनास्पर्ष असे हे उपचार आहेत. या उपचारांद्वारे रुग्णाच्या सूक्ष्म देहातील सप्त चक्रे व पंचतत्वे यातील दोषांचे निवारण केले जाते.

प्रश्न आहेत,

समस्या आहेत,

भीती आहे,

काळजी आहे,

तिथे उत्तर आहे.

तिथे उपाय आहे.

तिथे निर्धार आहे.

तिथे श्रद्धा आहे.

निसर्ग अनंत हस्ताने देतो आहे.

आपण फक्त त्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे.

आणि मनापासून प्रतिसाद द्यायचा आहे,

‘निरामय’ला आपल्याच स्वास्थ्यपूर्ण जीवनासाठी !